
सस्नेह नमस्कार,
प्रगतीचे स्पंदन, धनवृद्धीचे साधन म्हणजे कृष्णा - कोयना सहकारी पतसंस्था,
आपले संस्थेने ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे सर्व पर्याय खुले केले आहेत. बँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा होणारा विस्तार लक्षात घेवून आपल्या ग्राहकांना तंत्रज्ञानाच्या आधारे सेवा देण्यावर अधिक भर राहिला आहे. त्यादृष्टीने आपली संस्था सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करीत आहे. जग खूप वेगानं बदलतंय आणि प्रगतीचा नवनवीन टप्पा गाठतंय. अशा स्थितीमध्ये आपली संस्था त्याला कसा अपवाद असेल? संस्थेने आपल्या वाटचालीत अनेक नवनवीन संकल्प पूर्ण केले ध्येय गाठली आणि सभासदांच्या,ग्राहकांच्या व खातेदारांच्या मनामध्ये स्वतःचं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. संस्थेने तत्पर ग्राहक सेवा आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून नवीन ग्राहक आकर्षित करणे,व्यवसायिकता आणि नफाक्षमता,सक्षम आणि उत्तम सूक्ष्म व्यवस्थापनामुळे आपली संस्था जनमानसात परिचित झाली आहे. आपल्या संस्थेच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विद्यमान संचालक मंडळ तसेच संस्थेचे महाव्यवस्थापक श्री.अरुण पाटील (आप्पा) व सेवकवर्गाने अविरत श्रम, जिद्द, निष्ठा, यांच्या आधारे व त्यांच्या कुशल बुद्धीमत्तेतून सभासदांच्या दैनिक गरजेस अनुसरून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना साकार केल्या आहेत.त्या यशस्वी करण्यास हितचिंतकाचा आशीर्वाद तसेच सभासद व ठेवीदार यांचा संस्थेवरील दृढ विश्वास या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.