उल्लेखनीय कामगिरी
- मुख्यपृष्ठ
- आमच्याविषयी
- उल्लेखनीय कामगिरी
संस्थेच्या 9 शाखा व 1 मुख्यकार्यालय कार्यरत, प्रशासकीय कार्यालय, शाखा मंगळवार पेठ कराड व शाखा मलकापुर कराड या संस्थेच्या स्वत:च्या मालकीच्या जागेत कार्यरत आहेत.
आपल्या संस्थेने आयएसओ मानांकन बाबतचे सर्व निकष पूर्ण केलेने, संस्थेस ISO 9001:2015 मानांकन प्राप्त झालेले आहे. यामुळे संस्थेच्या नावलौकिक मध्ये आनखीनच भर पडलेली आहे.
अवीज पब्लिकेशन, कोल्हापूर या संस्थेमार्फत सहकार क्षेत्रात उत्कृष्ठपणे काम करणार्या सहकारी बँका व सहकारी पत संस्थांना प्रतिवर्षी बँको पुरस्कार प्रदान केला जातो. आपल्या संस्थेच्या भरीव उल्लेखनीय कार्याची दखल घेवून आपल्या संस्थेस बँको ब्लु रिबण पुरस्कार प्रदान केला आहे.
संस्थेस ICICI बँकेमार्फत IFSC CODE – ICIC0000106 प्राप्त झालेमुळे ग्राहकांचे देशातून अथवा परदेशातून संस्थेचे खातेमध्ये रक्कम तात्काळ जमा होण्याची सुविधा सुरू झालेली आहे. तसेच संस्थेच्या सर्व शाखामधून RTGS /NEFT सुविधा उपलब्ध आहे.
संस्थेने सर्व शाखामधून सर्व प्रकारची बिले (उदा. वीज बिल,डिश रीचार्ज,मोबाईल व लँड लाईन,पोस्टपेड बिल इ.) भरण्याची सुविधा सर्व शाखामधून सुरू केलेली आहे.
संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचे वाढते महत्व लक्षात घेवून संस्थेने स्वत:च्या मालकीचे अद्यावत डाटा सेंटर उभारलेले आहे. त्या अनुषंगाने संस्थेने कोअर बँकिंग प्रणालीचा अवलंब केला आहे. तसेच संस्थेच्या सर्व शाखा कोअर बँकिंग प्रणालीद्वारे जोडण्यात आलेल्या आहेत. तसेच ग्राहकांसाठी SMS ची सोय उपलब्ध झालेली.त्याचप्रमाणे संस्थेच्या कोणत्याही शाखेतून शाखा अंतर्गत पैसे काढता /भरता येतील अशी Any Where Banking ची सुविधा उपलब्ध झाली आहे.